महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटींचा निधी : फडणवीस


 

स्थैर्य, मुंबई, दि.४: मोदी सरकारने जाहीर
केलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटींचा निधी
मिळाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी
महाराष्ट्रातल्या कोणत्या भागाला किती निधी मिळाला त्याची यादीच ट्विट केली
आहे. देशातल्या १५ राज्यांमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा सुधारला आहे. हा
निकष लक्षात घेऊन केंद्र सरकारने २२०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
यातला महाराष्ट्राचा वाटा ३९६ कोटींचा असल्याचे फडणवीस यांनी त्यांच्या
ट्विटमधून लक्षात आणून दिले आहे.

औरंगाबाद १६ कोटी, मुंबई २४४ कोटी, नागपूर
३३ कोटी, नाशिक २०.५ कोटी, पुणे ६७ कोटी, वसई आणि विरारला १६ कोटी कोटींचा
निधी मिळाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशातील १५ राज्यांना हवेचा दर्जा
सुधारल्याने २२०० कोटींचा निधी जाहीर केला. या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश,
बिहार, छत्तीसगढ, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश,
महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, पश्चिम
बंगाल यांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!