दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । फलटण । संपूर्ण विश्वाला समतेचा व मानवतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाज फलटण यांच्यावतीने महारक्तदान शिबीर व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
वीरशैव लिंगायत समाज फलटण यांच्यावतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक ५ मे २०२० रोजी महाराजा मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते २ या वेळेत महारक्तदान शिबिर आयोजित केले असून सायंकाळी चार वाजता लिंगायत समाजाची जनगणना या विषयावर शरदराव गंजीवाले आणि आपला आहार व आपले आरोग्य या विषयावर डॉ. मनीषा अंबूपे यांचे व्याख्यान होणार असून सायंकाळी सहा वाजता वाई लिंगायत मठाचे अध्यक्ष श्री. ष. ब्र. १०८ सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज वाईकरयांचे प्रवचन व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व समाजातील बंधू-भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.