
दैनिक स्थैर्य । दि. 03 ऑगस्ट 2025 । फलटण । महसूल सप्ताहाअंतर्गत, कोळकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उद्या, सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची विविध महसुली कामे एकाच छताखाली केली जाणार आहेत.
या शिबिरामध्ये रेशनकार्डमधील नावे वाढवणे किंवा कमी करणे, रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, फेरफार अदालत, वारस नोंदी, सलोखा योजना, ‘पोट खराब’ क्षेत्र लागवडीयोग्य करणे, तसेच संजय गांधी निराधार योजनेसंबंधित कामे केली जाणार आहेत.
या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार नेते बाळासाहेब काशिद यांनी केले आहे. याचवेळी, “शासनाची ही योजना गावातील सामान्य आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत,” असे आवाहन सतीश शेडगे यांनी केले आहे.