
दैनिक स्थैर्य । दि. 03 ऑगस्ट 2025 । फलटण । महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह निमित्ताने, फलटण तालुक्यात उद्या, सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, १० महसुली मंडळांमध्ये ‘महाराजस्व अभियान’ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा या शिबिरांचा उद्देश असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
या शिबिरांमध्ये प्रामुख्याने फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारणे, वारस नोंदी (लक्ष्मी मुक्ती योजना), संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज स्वीकारणे, तसेच विविध प्रकारचे शासकीय दाखले वाटप करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
शिबिरांची ठिकाणे: सकाळी १० वाजल्यापासून खालील ठिकाणी शिबिरे आयोजित केली आहेत:
- आदर्की मंडळ: भैरवनाथ मंदिर, हिंगणगाव
- बरड मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, बरड
- तरडगाव मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, तांबवे
- राजाळे मंडळ: श्रीकृष्ण मंदिर (ग्रामपंचायतीमागे), विडणी
- गिरवी मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, निरगुडी
- होळ मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, सुरवडी
- वाठार निंबाळकर मंडळ: भैरवनाथ मंदिर (ग्रामपंचायत शेजारी), ढवळ
- कोळकी मंडळ: ग्रामपंचायत कार्यालय, कोळकी
- आसू मंडळ: काळेश्वर मंदिर, आसू
- फलटण मंडळ: हनुमान मंदिर, निंभोरे
या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी संबंधित मंडळ अधिकारी आणि सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका महसूल प्रशासनाने केले आहे.