दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महाराजा मल्टीस्टेट स्पर्धेच्या युगातही पूर्ण वैभवाप्रत नेणार असून यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देणार आहे, असे प्रतिपादन महाराजा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी फलटणचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
महाराजा मल्टीस्टेटच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान व्हा.चेअरमन रणजितसिंह भोसले होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संचालिका अॅड. सौ. मधुबाला भोसले, संचालक मंडळातील सदस्य तुषारभाई गांधी, चंद्रकांत पवार, हेमंत फुले, अमोल सस्ते, विलास रसाळ, अमित तापडीया (लोणंद), शिवराज सं. नाईक निंबाळकर, दिपराज तावरे, सुभाष आढाव तसेच हरिबुवा पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, माजी प्राचार्य सुभाष देशपांडे, श्रीरामचे माजी संचालक परशूराम तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराजा मल्टीस्टेटचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य एवढे आहे. ही संस्था कोरेगाव, म्हसवड, लोणंद, वडूज, बारामती शिरवळ, पंढरपूर व मुख्य शाखा फलटण यांचे माध्यमातून सहकाराने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूत्रांनुसार सर्वसामान्य माणसातून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना अर्थपुरवठा करीत आहे.
सभासद, ठेवीदार, खातेदार व कर्जदारांच्या सहकार्याने ही संस्था कार्यरत आहे. सध्या देशामध्ये ६१५ मल्टीस्टेट संस्था कार्यरत असल्या तरी ३१६ मल्टीस्टेट संस्था महाराष्टा्रत आहेत. त्यापैकी बहुतांश संस्था नगर जिल्ह्यात आहेत. असे असूनही गेल्या ३७ वर्षाच्या सहकारातील कामकाजासाठी एकही नोटीस आली नाही. काम करताना प्रथम कुटुंब दोन सहकारातील मल्टीस्टेट नजरेसमोर ठेवून कामकाज केले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगातही महाराजा मल्टीस्टेट पूर्ण वैभवाप्रत नेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे नफा वाटणी़मध्ये सभासदांना १२ टक्के लाभांश देणार आहोत. याबाबत सभासदांनी निश्चींत रहावे, असे आवाहन महाराजा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यकर्ते/महत्वाच्या राजकीय व्यक्तीस श्रध्दांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर (सरव्यवस्थापक), श्री. संदीप जगताप यांनी कार्यक्रमपत्रिकेचे वाचन केले. विषय क्र्र्र. १ ते ३ बहुमताने मंजूर करण्यात आले. विषय क्र. ४ ते ५ यावर साधकबाधक चर्चा होऊन मंजूर करण्यात आले. त्याप्रमाणे विषय क्र. ६ ते ८, विषय क्र. ९ ते १४, यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकाना अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, सरव्यवस्थापक श्री. संदीप जगताप यांनी सभासदांच्या शंकांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. विषय क्र. १५, तसेच विषय क्र. १६ यावरही सभासदांनी चर्चा केली.
यावेळी संस्थेचे विद्यमान व्हा. चेअरमन रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांनी संस्थेच्या २०२३-२०२४ चे आर्थिक वर्षाचा धावता आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अहवाल सालात ४२९ नवीन सभासद झाले असून भागभांडवल रु. २ कोटी ३५ लाख ६२ हजार ६०० एवढे असून संस्थेकडे ६ कोटी ५५ लाख १३ हजार ७७० रुपयांचा राखीव व इतर निधी आहे. संस्थेकडे १०४ कोटी २१ लाख ४४ हजार ८०९ रुपये ६४ पैसे रुपयांच्या ठेवी आहेत. त्याचप्रमाणे संस्थेने ३० कोटी ८२ लाख ९३ हजार ९२८ रुपये ५५ पैसे एवढी गुंतवणूक केली आहे. संस्थेस एकूण नफा २ कोटी ५० लाख ५२ हजार ७५९ रुपये ३१ पैसे एवढा झाला असून सहकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यासाठी रुपये २४ लाख ८४ हजार ६० एवढी तरतूद केली आहे.
संस्थेच्या नियोजित शाखा बेळगाव (कर्नाटक), पुणे शहर २, बारामती, भोर, सातारा, वाई, कराड, कोल्हापूर शहर, सांगली, नीरा, अकलूज नातेपुते येथे प्रत्येकी १ शाखा उघडण्याचा संकल्प आहे, अशी त्यांनी माहिती दिली.
व्हा. चेअरमन भोसले पुढे म्हणाले की, आपल्या सर्व शाखा व संस्था अत्यंत उत्तमप्रकारे कामकाज करीत असून संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचार्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये सी.ई.ओ. संदीप जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. संस्थाच्या व शाखांच्या माध्यमातून आपल्याला समाजपरिवर्तन करायचे असून सामाजिकबांधिलकी जपण्यासाठी सहकारात उत्कृष्ट काम करणार्या कार्यकर्त्यास यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्कार दिला जाणार असून यावर्षीपासून त्याची सुरुवात होणार आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. गणेश फेस्टीव्हलसाठी उत्कृष्ट कार्य करणारे मंडळ अगर कार्यकर्ते यांना प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख, व्दितीय पुरस्कार २५ हजार रोख, तृतीय पुरस्कार ११ हजार रोख स्वरूपात दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार पत्रकार कल्याण निधीचे प्रमुख रविंद्र बेडकिहाळ यांचा यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम रूपये एक लाख आहे. त्यानिमित्ताने मान्यवरांचे हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
याप्रसंगी त्यांनी सत्काराबाबत ऋण व्यक्त करून संस्थेचा अहवाल स्वतंत्र भोसले व्हिलेज अनाथश्रमास मदत याबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास सदगुरू संस्था समूहाचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद महिला, कार्यकारी समितीचे अध्यक्ष, सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशाप्रकारे महाराजा मंगल कार्यालयामध्ये संस्थेची १४ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.