
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : फलटण येथील महाराजा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडची सन २०२४-२०२५ या सालातील १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे होणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला सोसायटीच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे.