
फलटण येथील महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखालील नवीन संचालक मंडळाची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली.
स्थैर्य, फलटण, दि. १० मार्च : महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा भक्कम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या पारदर्शक आणि गतीमान कारभारामुळे संस्थेची सलग चौथी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव आणि सहाय्यक निबंधक राहुल देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील यांनी सभासदांच्या उपस्थितीत नूतन बिनविरोध संचालकांची नावे अधिकृतपणे जाहीर केली.
८०० कोटींची उलाढाल अन् सलग चौथी निवडणूक बिनविरोध
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत विस्तारलेल्या आणि सुमारे ५ हजार सभासद असलेल्या ‘महाराजा मल्टीस्टेट’ची सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा करिष्मा विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले आणि व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी करून दाखवला आहे.
सुमारे ८०० कोटी रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या मल्टीस्टेटला विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी पारदर्शक कारभार, प्रशासकीय काटकसर आणि नेहमी सभासद व ठेवीदारांचे हित जोपासत प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे.
सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी बिनविरोध निवडून आलेले नूतन संचालक मंडळ खालीलप्रमाणे:
-
दिलीपसिंह भोसले
-
रणजितसिंह भोसले
-
अॅड. सौ. मधुबाला भोसले
-
सौ. प्रियदर्शनी भोसले
-
तुषार गांधी
-
हेमंत फुले
-
अमोल सस्ते
-
कुमार भट्टड
-
विलास रसाळ
-
दिपराज तावरे
-
सुभाष आढाव
