महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटणया सोसायटीच्या चेअरमन पदी दिलीपसिंह भोसले तर व्हाईस.चेअरमन पदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२३: महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण. जि.सातारा महाराष्ट्र राज्य या सोसायटीच्या चेअरमन पदी दिलीपसिंह भोसले तर व्हाईस.चेअरमन पदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संचालक मंडळाची निवड करण्यात आली तर संचालक पदी अ‍ॅड. सौ मधुबाला भोसले, ,तेजसिंह भोसले, सौ प्रियदर्शनी भोसले, अमोल सस्ते, हेमंत फुले, अमित तापडिया, राजन भाऊ फराटे, राजेंद्र नाईक निंबाळकर, तुषार गांधी, , दिपराज तावरे, शिवराज नाईक निंबाळकर, सचिन भोसले, कुमार भट्टड, चंद्रकांत पवार ,निलेश मोरे, राजाराम फणसे, सुहास निकम, डॉ विलास रसाळ, सुभाष आढाव यांची निवड झाली.सद्गुरु व महाराजा संस्था समूहतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!