महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड व श्री. श्री. रविशंकर साधना ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमे निमित ग्रींन हँड मोमेंट चा शुभारंभ


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । फलटण । महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ,फलटण व श्री. श्री. रविशंकर साधना ग्रुप लक्ष्मी नगर फलटण. यांचे संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमे निमित ग्रींन हँड मोमेंट चा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पद्मावती नगर रोड, भडकमकरनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाराजा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संचालिका ॲड.सौ. मधुबाला भोसले श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, . स्वयंसिद्धा महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमन सौ. राजस भोईटे ,श्री सद्गुरु शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ स्वाती फुले, श्री. श्री.रविशंकर साधना ग्रुप चे उत्तम चोरमले श्री. व सौ. पाटील साहेब महाराजा मल्टीस्टेटचे सीईओ संदीप जगताप, संचालक, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!