सलग चौथ्यांदा चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दिलीपसिंह भोसले यांचा सेवकांकडून सत्कार; महाराजा मल्टीस्टेटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान


महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या चेअरमनपदी सलग चौथ्यांदा दिलीपसिंह भोसले तर व्हाईस चेअरमनपदी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या सेवकांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. 22 मार्च : नुकत्याच पार पडलेल्या महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित संचालकांमधून संस्थेच्या चेअरमनपदी दिलीपसिंह भोसले यांची सलग चौथ्यांदा आणि सानमानाने बिनविरोध निवड झाली आहे. तर, संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी (उपाध्यक्ष) रणजितसिंह भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आणि संस्थेवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याबद्दल, संस्थेतील सर्व सेवकांच्या वतीने नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व नवनिर्वाचित संचालकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे जनरल मॅनेजर संदीप जगताप यांच्या शुभहस्ते या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सलग चौथ्यांदा चेअरमनपदाची धुरा अत्यंत विश्वासाने सांभाळणारे दिलीपसिंह भोसले आणि तरुण नेतृत्व रणजितसिंह भोसले यांच्या निवडीमुळे सेवकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या सत्कार प्रसंगी महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी आणि श्री सद्गुरू पतसंस्थेचा सर्व सेवक वर्ग व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!