दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । विद्यार्थ्यामध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व रुजावे, संविधानाने त्यांना दिलेले अधिकार व हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी २६ नोव्हेंबर संविधान साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योतीच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.
फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नेवसे बोलत होते. त्यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, उपप्राचार्य श्री फडतरे, निरिक्षक श्री राजगुडा, पर्यवेक्षक श्री गोडसे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात महाज्योतीच्या माध्यमातून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थींनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी मिलिंद नेवसे यांनी केले.