दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । पंढरपूर । दरवर्षी केवळ वाल्मीकी जयंतीला कोळी समाजाची आठवण करून वाल्मीकी प्रतिमेला हार घालण्यासाठी येणाऱ्या व त्यानंतर समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे हेतुपुरसर दुर्लक्ष करणाऱ्या राजकिय नेत्यांना पंढरपूर येथे समाजाच्या वतीने आर्त हाक देण्यात आली व जयंती प्रमाणेच इतर वेळी समाजाचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याची विनंती करण्यात आली
यावेळी गणेश अंकुशराव यांचे नेतृत्वात दरवर्षी पंतप्रधान मोदीजी काँग्रेसचे राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री अमीत शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनविस शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करतानाचे फोटो लावून आंदोलन केले ही गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली – आज महादेव कोळी समाजाचे जातीचा दाखला व जात पडतानी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे ही मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबीत आहे तसेच राघोजी भांगरे यांचे स्मारक बनवने सेवेतून निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर घेणे, अधिसंख्य पदावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व शासकिय लाभ, सेवानिवृत्ती लाभ देणे अशा अनेक मागण्या आहेत या मागण्या प्राधान्याने पूर्ण कराव्या अशी आग्रही मागणी आज कोळी महादेव समाजाच्या वतीने करण्यात आली.
दरवर्षी केवळ वाल्मीकी जयंतीला येवून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी कोरडी आश्वासने आज तागायत देण्यात आली.
परंतू या पोकळ आश्वासनाला समाज आता कंटाळला असून यापूढे हा समाज आखादनाला भूलनार नाही तरी सर्व नेत्यांना गर्भित इशारा या निमिताने आज कोळी बांधवांनी दिला असून यापुढे आर या पार च्या लढाईसाठी सर्व कोळी बांधवांनी तयार रहावे असे गणेश अंकुशराव यांनी आवाहन केले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या ‘ओ मोदीजी, ओ ठाकरेजी, ओ शिंदे जी, ओ फडणविसजी, ओ अमित शहा जी, ओ पवारसाहेबजी जरा महादेव कोळी समाजाकडे लक्ष द्या. आमचे प्रश्न सोडवा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महर्षी वाल्मिकी संघटनेचे सोलापूर जिल्हयातील सर्व पदाधिकारी व असंख्य महादेव कोळी समाज उपस्थित होता.