दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | तालुक्यातील कुरवली येथील भारतीय जनता पार्टीचे असणारे महादेव गोळे व नामदेव घनवट यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याच्या बातम्या व फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
त्यानंतर महादेव गोळे व नामदेव घनवट यांनी पुन्हा माजी खासदार रणजितसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना गोळे व घनवट म्हणाले कि; तालुक्यातील काही मान्यवर मंडळी हि अचानक पणे आमच्या घरी आली. ती घरी आल्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व मानपान आम्ही सुद्धा केले.
त्यावेळी त्यांच्याकडून मुद्दामून फोटोज व्हायरल केले गेले आहेत. परंतु आम्ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत होता व यापुढे सुद्धा कार्यरत राहणार आहे.