महाबळेश्वर झाले कार्निवलमय

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 4 मे 2025। सातारा । महाबळेश्वर येथे होत असलेल्या महापर्यटन उत्सवामध्ये या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी कार्निवल परेड महाबळेश्वर येथे उत्साहात, अनेक रंगांची उधळण करत असंख्य पर्यटकांच्या साक्षिने संपन्न झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आराम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे महाराजांना अभिवादन करून व दुर्गा मातेच्या मूर्तीला नमन करून सुरुवात केली.

या परेडमध्ये पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील, श्रीमती विजयादेवी देसाई, सौ. स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबेसिडर मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार, पर्यटक सहभागी झाले होते.

कार्निवल परेडमध्ये महाराष्ट्रभरातील संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या पथकांचा सहभाग उत्साह वाढविणारा होता. नाशिक ढोल, लेझीम, वारकरी संप्रदाय, हलगी, यांच्या निनादात ही परेड संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या वेशभूषेतील पथकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याबरोबरच मास्कोट घातलेले कलाकार यांनाही लोकांनी दाद दिली. या संपूर्ण परेडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई ठिकठिकाणी लोकांशी, व्यापार्‍यांची, पर्यटकांशी संवाद साधत होते. महाबळेश्वरने अनुभवलेली ही कार्णीवल परेड अनोखी आणि अनेक काळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहील अशी झाली. ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून या परेडचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!