महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 55 मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यामध्ये चौथ्या दिवशीही वळिवाचा तडाखा कायम


दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी वळीवाच्या पावसाचा जोर कायम आहे .गुरुवारी दिवसभर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची स्थिती निर्माण झाली आहे शेती पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .तर जिल्ह्याचे नंदनवन समजले जाणार्‍या महाबळेश्वर तालुक्यामध्ये डबल 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .

गेल्या चार वर्षात प्रथमच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे वारंवार क्षेत्र विकसित होऊन पश्चिम महाराष्ट्राला सातत्याने वळीवाच्या पावसाला सामोरे जावे लागत आहे . ही स्थिती आगामी तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गुरुवारी सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या . दुपारच्या काही तासाचा अपवाद वगळता सकाळ आणि संध्याकाळी सातत्याने पावसाचा जोर कायम होता .जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्कालीन विभागाला प्रत्यक्ष सूचना देऊन जिल्ह्यातील नुकसानीचे आकडेवारी गोळा करून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत सातारा नगरपालिकेने सुद्धा शहरांमध्ये कर्मचार्‍यांचे पथक तैनात करून साठलेल्या पाण्याच्या निर्मूलनाचे काम सुरू केले आहे सातारा शहरासह परिसरात गेल्या सहा दिवसापासून पाऊस पडतोय गेल्या तीन दिवसापासून तर पाऊस धो धो कोसळत असल्याने रस्त्यावर दगड माती आल्याने राडारोडा वाढला आहे .सातार्‍यात काही ठिकाणी घरात आणि दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले आहे सकाळी नागरिकांना छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागले

मे महिन्याचा उष्णतेचा तडाखा वळिवाच्या पावसामुळे जाणवलेला नाही गेल्या 24 तासांमध्ये महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 55.7 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे .येथे पावसामुळे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे . गेल्या 24 तासांमध्ये सातारा तालुक्यात 34.9 पाटण तालुक्यातील 30.8 कराड तालुक्यात 33.8 कोरेगाव तालुक्यात 34.7 खटाव तालुक्यात 34.5 माण तालुक्यात 34.3 फलटण तालुक्यात 24.3 खंडाळा तालुक्यात 25.9 आणि वाई तालुक्यात 35.1 मिलिमीटर पाऊस झाला तर सर्वात कमी पाऊस जावळी तालुक्यात 4.1 मिलिमीटर झाला आहे.

सातारा जिल्ह्यात सायंकाळ पासून पुन्हा मुसळधार

जिल्ह्यात गेले चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेला पाऊस दुपारी बारानंतर थोड्या कमी प्रमाणात पडू लागला त्यानंतर दिवसभर गारवारे आणि थंडीमुळे अक्षरशः पावसाळ्याचा फील जाणवत होता त्यातच दुपारी चार नंतर पुन्हा अंधार पडून सायंकाळी पाच वाजल्यापासून या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील अकरापैकी नऊ तालुक्यात या पावसाचा जोर असून पश्चिमेच्या भागांमध्ये विशेष करून महाबळेश्वर जावली सातारा पाटण या तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा कळंबा दिसून येत होता तसेच सातारा शहरातील अनेक सखल भागात घरातून पाणी शिरल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!