मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राज्य शासनाने सगेसोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत ठिक राहावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा फडतरवाडी, ता. फलटण या शाखेच्या वतीने फलटण येथील जोतिबा मंदिरात महाआरती घेण्यात आली. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी जोतिबा चरणी प्रार्थना करण्यात आली.

या महाआरतीला फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व फडतरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जोपर्यंत आमरण उपोषण सुरू आहे, तोपर्यंत दररोज ही आरती सुरू राहणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक दिवस मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा आमरण उपोषण केले होते, दरम्यान, त्यानंतर वाशी (मुंबई) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील इतर सहकार्‍यांनी लेखी आश्वासन दिले होते की, ९ फेब्रुवारीपर्यंत तसा अध्यादेश पारीत करू, मात्र अद्याप राज्य सरकारने अधिवेशन बोलावले नसून त्या ठरलेले वेळेत मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून ते पाणीसुद्धा पित नसल्याने त्यांची तब्बेत ढासळत चालली आहे. त्यांना काही झाल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठेल, हे मुख्यमंत्री व राज्य सरकारने लक्षात घ्यावे व ताबडतोब अधिवेशन बोलावून अध्यादेश पारित करून तसा कायदा करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने केली आहे.

या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही आरती करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!