बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क मध्ये महा श्रमदान सप्ताह संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । बारामती । बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क मध्ये खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाश्रमदान (12/12/2022 ते 19/12/2022) सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. या मध्ये स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण,आरोग्य शिबिर आणि फायर सेफ्टी प्रशिक्षण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जवळपास 3500 कर्मचारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने महिला कर्मचारी कार्यरत होते.

महाश्रमदान सप्ताह मध्ये पेपरमिंट क्लोदिंग प्रा. लि.,कॉटनकिंग तेजवानी, गीता फॅशन, पायोनियर, पर्पल, टायझर,प्रोम गर्ल, स्पार्कल
बारामती पॅकेजिंग इंडस्ट्री, बारामती बँक टीम बीव्हीजी टीम, बारामती दोस्ती ग्रूप बारामती, छत्रपती ट्रान्सपोर्ट डाॅ. भोईटे हॉस्पिटल स्टाफ & कर्मचारी, डॉ.काटे डोळ्यांचा दवाखाना श्री. स्वामी समर्थ लेबर सप्लायर अँड सिक्युरिटी, पाणी फाऊंडेशन टीम, एमआयडीसी फायर स्टेशन, सीएफसी आउटलेट टीम, कलावती ओम टेक्सटाईल, दीप मंगल टेक्स्टाईल, अनंता मर्क अँड ऋषिकेश मल्टीपर्पज सर्विसेस, ओम जय ट्रॅव्हल्स मॉडर्न कॉम्प्युटर, बारामती ग्रामपंचायत वंजारवाडी पार्क ऑफिस व गार्डन टीम सर्पमित्र श्री घाडगे, आदींनी श्रमदान मध्ये सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!