
दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2025 | फलटण | तालुक्यातील नाईकबोमवाडी येथील शिवजल सिटीमधील शिवजल मंदीर बुधवार, दि. 26 फेब्रुवारी पासून सर्वांसाठी खुले होणार आहे. या प्रसंगी महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बुधवारी सकाळी 8 ते 5 या वेळेत भव्य शिवजल उर्जा कलश पूजा श्री क्षेत्र नाशिक येथील यज्ञाचार्य वेदोपासक भूषण शुक्ल गुरूजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी महायज्ञ, शिवअभिषेक, स्त्रोत, मंत्र, पूजा पठण करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत अघोरी तांडव संपन्न होणार आहे. रात्री 8 ते 9 या वेळेत BSR अजमेर कोच भुपेंद्र सिंग राठोड यांचे शिवजल उर्जा ध्यान कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 ते 10 या वेळेत शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांचे शिवजल उर्जा ध्यान कार्यक्रम होणार आहे. रात्री 12 ते 3 या वेळेत शिवजल स्वामी महायज्ञ संपन्न होणार आहे. दरम्यान, रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत शिवजल जागर सुरू राहणार आहे.
महाशिवरात्र निमित्त होणारे हे धार्मिक कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे ठरणार आहेत.