इंदापूर येथे ९ रोजी ओबीसी समाजाचा ‘महा एल्गार’ मेळावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
इंदापूर येथे दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी ओबीसी समाजाचा ‘महा एल्गार’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर, प्रा. टी. पी. मुंडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

या मेळाव्याला फलटण तालुक्यातील ओबीसी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. तसेच ओबीसी समाजावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फलटण तालुक्यातील ओबीसी समाजबांधवांची बैठक बुधवार, दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत सावता माळी मंदिर, फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे, या बैठकीला जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!