
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : गणेश चतुर्थीपासून दिवाळीपर्यंतच्या आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन, ‘मॅग फायनान्स’ या वित्तीय संस्थेने एक विशेष गोल्ड लोन योजना सादर केली आहे. ‘सण आला, सोनं सोन्याचं झालं!’ या संकल्पनेवर आधारित या योजनेमुळे ग्राहकांना अत्यंत सुलभ अटींवर सोने तारण कर्ज उपलब्ध होणार आहे.
सणांच्या काळात वाढणारा खर्च आणि पैशांची गरज भागवता यावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. या योजनेमुळे नागरिकांना त्यांचे सोने घरात न ठेवता त्याचा योग्य वापर करून आपल्या गरजा पूर्ण करता येणार आहेत.
मॅग फायनान्स गोल्ड लोन योजनेची वैशिष्ट्ये:
- अत्यल्प व्याजदर: कर्जावर प्रति महिना केवळ ०.९९% इतका कमी व्याजदर आकारला जाणार आहे.
- शून्य प्रोसेसिंग शुल्क: कर्जदारांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) घेतले जाणार नाही.
- सोन्याला सर्वाधिक दर: बाजारातील प्रचलित दरांनुसार सोन्याचे सर्वाधिक मूल्यांकन करून त्यावर जास्तीत जास्त कर्ज रक्कम दिली जाईल.
- विशेष सण-उत्सव बोनस: योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या पहिल्या ५० ग्राहकांना कंपनीतर्फे एक विशेष भेटवस्तू दिली जाणार आहे.
ही योजना सणासुदीच्या मर्यादित कालावधीसाठी असून, गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॅग फायनायतर्फे करण्यात आले आहे.