
स्थैर्य, वडूज, दि.२२: कोरोना पार्श्वभूमीवर शासन विविध स्तरांवर उपाय योजना करत आहे. वडूज नगर पंचायत च्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु करण्यात आली असून सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वडूज नगरपंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.
शहरा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पोहोचला असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ची तपासणी करणं आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व नगरपंचायत कर्मचारी प्रत्येक कुटुंबात प्रत्यक्ष भेट देणार असून कोरोना आजार विषयी तपासणी करून माहिती घेणार आहेत. या मोहिमेतुन अनेकांना कोरोना बाधित होण्या पूर्वी उपाय योजना व औषधोपचार मिळणं सोपं होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करून आपलं कुटुंब तपासणी करण्याचे आवाहन नगरपंचायत च्या वतीने माधव खांडेकर यांनी केले आहे.