
स्थैर्य, सातारा, दि. 14 : माजी खा . माधवराव पाटील यांचे वृध्दापकाळाने आज सकाळी निधन झाले. जनलक्ष्मी सहकारी बॅकेची उभारणी करणारे माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाचे दीर्घ काळ उपाध्यक्ष होते.
त्यांनी जनलक्ष्मी बँकेचे 40 वर्षे अध्यक्षपद भुषविले. सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव असल्याने जनलक्ष्मी बॅंक कठीण काळात त्यांनी वाचविली. त्यांची राजकीय वाटचाल शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून झाली. संसद भंग झाल्याने त्यांना खासदारकीची पूर्ण टर्म लाभली नाही. के के वाघ शिक्षण संस्थेच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. राज्य सहकारी बँकेचे संचालक पद त्यांनी भूषविले. नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीत त्यांचा निकटचा वाटा होता. मितभाषी असणा-या अप्पासाहेबांचा मोठा मित्र परीवार होता.