४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । नागपूर । ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’ या शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मदनजी गडकरी यांनी जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलावंत आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीने जुन्या पिढीतील महत्त्वाचा मार्गदर्शक गमावला आहे, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.