
स्थैर्य, सातारा, दि.३०: आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेंद्रे येथील अजिंक्यतारा इंडेन गॅस एजन्सी आणि इंडियन ऑइल कंपनीच्या पुणे- २ सेल्स एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने हरित एवं स्वच्छ ऊर्जा अंतर्गत एल.पी.जी. पंचायत या कार्यक्रमाचे आयोजन ए.बी.आय.टी कॉलेज येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील २०० महिला उपस्थित होत्या.
इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक एस.के. झा यांनी ग्राहकांनी घरगुती गॅसचा वापर करताना आपली सुरक्षितता कशी राखावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत चालणाऱ्या या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन एरिया मॅनेजर राजेश भगत यांनी केले. विजय गाढवे यांनी गॅस सुरक्षिततेबाबत प्रात्यक्षिक सादर केले. अजिंक्यतारा इंडेन गॅस एजन्सीचे व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक कदम, म्हावशे, रणजित जाधव, वैभव पाटील, कॉलेजचे प्राचार्य सतीश धुमाळ, भोसले सर, नलावडे सर, आबा गुरव, सणस आदींनी परिश्रम घेतले.