सासकल येथे २००७ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह व कृतज्ञता मेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । फलटण । मौजे सासकल ता. फलटण येथे सन २००७ च्या त्याच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गुरुजनांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांनी सस्नेह मेळावा आयोजित केला होता. सदर मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ज्ञानेश्वर पिसाळ व राहुल मुळीक यांनी विशेष प्रयत्न केले. या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई येथे लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या याच २००७ च्या बॅचमधील ज्योती मुळीक हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिला या कार्यक्रमांमध्ये आपल्या गुरुजनांच्या हस्ते मानपत्र व शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या वाढणाऱ्या तापमानाविषयी चिंता व्यक्त करत विविध पातळ्यांवर वृक्षारोपणाचा मूलमंत्र जपला जात असताना याच २००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला. या सस्नेह कृतज्ञता मेळाव्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तानाजी सस्ते, राजेंद्र सस्ते, मंगल माने, अजित निकाळजे,नलिनी माडकर, चांगण मॅडम, अंगणवाडी सेविका पुष्पावती मुळीक , शारदा मुळीक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अर्जुन शेडगे, ज्ञानेश्वर बेलदार, सुतार सर, दाणी मॅडम,कर्मचारी ह.भ प गायकवाड महाराज(मामा), फाळके मामा यांना मानपत्र फेटा व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी धनाजी मुळीक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तुळशीराम शिंदे यांचा ही सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना गुरुजनांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केलं, दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांची आपल्या गुरुजनांच्याविषयी व शाळेच्याविषयी असणारी कृतज्ञतेची भावना याबद्दल शिक्षकांनी येणाऱ्या काळात खूप आशादायी वातावरण येणार असल्याचे नमूद केले. सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे आपल्या गुरुजनांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनत व प्रयत्न काही आठवणी काही प्रसंग सांगून त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. यावेळी राहुल पिसाळ या विद्यार्थ्याने आपल्या शैलीमध्ये शाब्दिक कोट्या करून वातावरण हलकं फुलकं केलं. या कार्यक्रमासाठी सन २००७ च्या बॅचमधील ज्योती मुळीक, माधुरी मुळीक – भोसले, संध्या मुळीक – शिंदे, कविता डांगे, मनीषा मदने, सोनाली मदने, राहुल पिसाळ, राहुल मुळीक, ज्ञानेश्वर पिसाळ, नवनाथ चांगण, अक्षय पवार, अनिरुद्ध मुळीक, राम चांगण, दीपक दळवी, जयदीप डांगे, श्रीकांत डांगे, नंदकुमार जाधव, या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध सोपान मुळीक यांनी केले तर प्रास्ताविक नवनाथ चांगण यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!