दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, केंद्र फलटण च्यावतीने भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सद्गुरू दादा महाराज मठ येथील हॉलमध्ये भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवून मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून सांगितले की, दरवर्षी आपण भगवान परशुराम यांच्या नावाने समाजातील उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. आज भगवान परशूराम यांना आदरांजली समर्पित करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय चरेगावकर, आर.डी. इनामदार, नंदकुमार केसकर, चंद्रशेखर दाणी, अॅड. विजय कुलकर्णी, संजय चिटणीस यांच्यासह ब्राह्मण संघटनेचे सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय भगवान परशुराम’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.