भगवान महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आज अधिक प्रासंगिक – राज्यपाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२३ । मुंबई । सध्या रशिया – युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरु आहे. अनेक देश आर्थिक अरिष्टांना सामोरे जात आहेत. शेजारच्या देशांमध्ये महागाई वाढली आहे. लोकांना अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. अशावेळी भारताने भगवान महावीरांनी सांगितलेला करुणा भाव पुन्हा जागवावा. तसेच महावीरांची अहिंसाअपरिग्रह व अनेकांताची शिकवण आचरणात आणावीअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहमुंबई येथे जैन समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते.  

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

            भारत जैन महामंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनजैन आचार्य डॉ. प्रमाण सागर महाराजराष्ट्रसंत नम्रमुनी महाराजआचार्य नय पद्मसागरडॉ. अभिजित कुमारमुनी जागृतकुमारभारत जैन महामंडळाचे अध्यक्ष चिमणलाल डांगी तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

            महात्मा गांधींच्या जीवनावर भगवान महावीरांसह अनेक जैन संतांच्या विचारांचा प्रभाव होता. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेतलेल्या  खान अब्दुल गफार खानमार्टिन ल्यूथर किंगनेल्सन मंडेलादलाई लामाडेस्मंड टुटू या नेत्यांवर देखील सत्य व अहिंसा या जैन तत्वज्ञानाच्या शिकवणीचा प्रभाव होताअसे राज्यपालांनी सांगितले. 

            झारखंड येथे जैन लोकांचे पवित्र तीर्थस्थळ असलेले श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास त्या ठिकाणचे पावित्र्य जपले जाणार नाही. यास्तव ते ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी आपण स्वतः झारखंडचे राज्यपाल असताना प्रयत्न केलेअशी माहिती राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी दिली.    

            कोरोना काळामध्ये जैन समाजाने मानवता व करुणेचे दर्शन घडवले. तसेच गोरगरिबांना अन्न व पाण्याची व्यवस्था उपलब्ध केली, याबद्दल राज्यपालांनी जैन समाजाबद्दल प्रशंसोद्गार काढले.

            जलसंसाधन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी जैन आचार्य राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज व आचार्य नयपद्मसागर महाराज यांनी मार्गदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जैन आचार्य डॉ. प्रमाणसागर महाराज यांच्या भगवान महावीर का आर्थिक चिंतन‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!