ट्रॅव्हल्समधून ७0 हजाराचा ऐवज लंपास


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । सातारा । प्रवासासाठी एक महिला मुंबई येथून कोल्हापूरकडे जात होती. ज्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत होत्या त्याच दरम्यान त्यांच्याजवळील बॅगेतून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा ७० हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. ही घटना बुधवार, दि. २ मार्च रोजी घडली. याप्रकरणी एका महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत सातारा शहर पोलिस स्टेशनमधून देण्यात आलेली माहिती अशी, राजश्री व्यंकटेश पाटील रा. मुंबई यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री पाटील या मुंबईतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच, ०९. इएम, ३४३४ मध्ये बसल्या होत्या. त्या साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आल्यावर त्यांना अज्ञाताने चोरी केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या चोरीमध्ये सोन्याची ५ ग्रॅमची कर्णफुले, मोबाईल, साडे दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे ७० हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. याबाबतचा अधिक तपास सातारा शहर पोलिस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!