मारहाण करून ऐवज लुटला


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । सातारा । येथील बाँबे रेस्‍टॉरंट चौकातून सदरबझारकडे चालत निघालेल्‍या महेंद्र शिवाजी कामटे यांना मारहाण करत लुटल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात दोन अनोळखींवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांनी कामटे यांची सोन्‍याची अंगठी आणि रोकड लुटली असून संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

सदरबझार मध्‍ये महेंद्र कामटे (वय ४५) हे राहण्‍यास आहेत. ता. ३० रोजी रात्री ते बाँबे रेस्‍टॉरंट येथील सेवारस्‍त्‍यावरुन चालत सदरबझारकडे निघाले होते. यावेळी त्‍यांच्‍याजवळ एक मुलगी आली. तीने कामटे यांना थांबण्‍यास सांगितले. याचदरम्‍यान तीच्‍या सोबत असणाऱ्या दोन युवकांनी कामटे यांना मारहाण सुरु केली. मारहाण करत असतानाच त्‍या दोघांनी कामटे यांच्‍या हातातील सोन्‍याची अंगठी आणि रोकड असा सुमारे १८ हजारांचा ऐवज लुटला. ऐवज लुटल्‍यानंतर कामटे यांना धमकावत त्‍या युवकांनी पळ काढला. याची तक्रार काल कामटे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार दोन अनोळखी युवकांवर जबरी चोरीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून घटनास्‍थळाची पाहणी वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी करत तपासाच्‍या सुचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्‍या. याचा तपास सहाय्‍यक निरीक्षक मोरे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!