स्थैर्य, वाई, दि.०२: सोनगिरवाडी (ता. वाई) येथील विलीस एफ पीअर्स मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅशिअर रुममधून अज्ञात चोरट्याने ड्रॉवर उचकटून दोन लाख 57 हजार 113 रुपये रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दि 24 मार्च रोजी सोनगिरवाडी (ता. वाई) येथील विलीस एफ पीअर्स मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅशिअर रुमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करीत ड्रॉवर उचकटून त्यामधील दोन लाख 57 हजार 113 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार स्टेला तिलसराव शिर्के (वय 35, रा. मिशन हॉस्पिटल कॉटेज, सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी बरडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिस उपनिरीक्षक मोतेकर तपास करीत आहेत.