गुगल पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून बॅंक खात्यातील ९८ हजार ५६२ रुपये लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३१: गुगल पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून रिचार्जसाठी गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एनी डेस्क’ हे ऍप्लीकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे बॅंक खात्यातील ९८ हजार ५६२ रुपयांची फसवणूक केल्याची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी वैशाली सुधीर कांबळे (रा.विलसापूर,सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.२९ रोजी कांबळे यांच्या मोबाइलवर फोन आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने गुगल पे’ कस्टमर केअर सेंटरमधून अरविंद कुमार बोलत असल्याचे सांगितले. रिचार्ज करण्यासाठी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही मोबाइलमध्ये एनी डेस्क हे ऍप्लीकेशन डाऊनलोड करा” असे सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे कांबळे यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये एनी डेस्क हे ऍप्लीकेशन डाऊनलोड केले. त्यानंतर त्या ऍप्लीकेशनच्या माध्यमातून कांबळे यांच्या बॅंक खात्यातील ९८ हजार ४६२ रुपये परस्पर काढून घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे हे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!