बॅंकेतून बोलतोय असे सांगून लाखाचा गंडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०७: हॅलोऽ मी ऍक्‍सेस बॅंकेतुन बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील एका महिलेला एक लाख 7 हजार 353 रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तृप्ती प्रसन्न साळुंखे (रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार साळुंखे यांच्या मोबाइलवर दि. 15 मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ऍक्‍सिस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून साळुंखे यांना त्यांच्या क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवण्याच्यासाठी तसेच साडे नऊ हजार रूपयांचे गिफ्ट देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. त्यावर साळुंखे यांनी विश्‍वास ठेवत त्याच्यासोबत संभाषण सुरू ठेवले असता त्याने त्यांच्या क्रेडीट कार्डच्या नंबरचे शेवटचे चार अंक विचारून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेत, त्यांच्या क्रेडीट कार्डवरून दि.15,16,18 मार्च रोजी वेगवेगळी एकूण तीनवेळा साळुंखे यांची एक लाख 7 हजार 353 रूपयांचे त्याच्या बॅंक खात्यावर वर्ग करून त्यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत. जर कोणाला अशाप्रकारे फोन आले तर त्यांना तुमच्या बॅंक खात्याबाबत अथवा वैयक्तीक कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पतंगे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!