साताऱ्यात सव्वा लाखाच्या दागिन्यांची चोरी


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । सातारा । रविवार पेठ, सातारा येथून दागिन्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे अज्ञाताने स्टील डब्यातून हे दागिने नेले. ही घटना १५ जून रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. या चोरीनंतर वासंती चंद्रकांत महापरळे रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, सातारा यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, राहत्या घरातील स्टीलच्या डब्यात पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. या दागिन्यांची चोरी झाली. याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये होती. याबाबतचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार भिसे हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!