आज दिवसभर प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रजासत्ताक निमित्त राष्ट्र प्रेम व देशाभिमान जागृत होणार. मला ही देशाभिमान आहे, पण खोलवर विचार केल्यावर काही मुद्दे मनात उत्पन्न झाले. बघा पटतात का…
आपले कर वेळेवर भरणे. रस्त्यावर न थुंकणे. तिरंगा खिशाला अभिमानाने मिरवणे पण नतंर काय ? देशासाठी बलिदान देणारे व त्यांचे कुटुंबिय यांच्याबद्दल आदर बाळगणे. कचरा वेगवेगळा करून देणे. सिग्नल हे दिवाळीचे लाईट नसून ट्राफिक कायदे आहे, हे मानणे. रुग्णवाहिकेला रस्ता देणे. देशाने तुम्हाला काय दिले ह्याचा विचार न करता आपण देशाला काय देतो आहोत, ह्याचा विचार करणे म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करणे.
स्वातंत्र्य, समता, बंधूता यांचे पालन करणे. हक्क व कर्तव्ये यात गल्लत न करणे. सर्वधर्म समभाव ही भावना वाढीस लागणे. गाभाभूत दहा राष्ट्रीय मूल्यांची जपणूक म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करणे. यंदा राजपथावरील संचलनात महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ संत परंपरेचे दर्शन घडविणार आहे. संपूर्ण जगाला संत महिमा व भागवत धर्माच्या कार्याची महती कळणार. प्रसार माध्यमातून संत महिमा पाहायला मिळणार. महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा. गर्जा महाराष्ट्र माझा.
कोविडमुळे अत्यंत साधेपणाने प्रजासत्ताक दिन साजरा करुन भावी पिढीला हा वैभवशाली ऐतिहासिक ठेवा किती अनमोल आहे. याची जाणिव व सामाजिक भान आणून देणे.