
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। लोणंद । येथील मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने खेमावती नदीच्या काठावर शुक्रवारपासून दि. 18 एप्रिल ते रविवार दि. 20 एप्रिल दरम्यान सायं 6.30 वाजता खेमातीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवार दि. 18 रोजी ग्रामीण कथाकार प्रा.श्री. रविंद्र कोकरे यांचे ’माती, नाती, संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानीे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील भुषविणार आहेत. कार्यक्रमास नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणिभाई कच्छी , लोणंद टिंबर मर्चेंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिठूभाई पटेल हे उपस्थित राहणार आहेत.
दुसरे पुष्प शनिवार दि. 19 रोजी माजी सनदी अधिकारी अध्यक्ष डॉ. श्री. इंद्रजीत देशमुख यांचे ’माणूस म्हणून जगताना ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे भुषविणार आहेत. यावेळी लोणंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शामसुंदर डोईफोडे, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अवधुत किकले, लोणंद इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. सौ. मनिषा काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तिसरे पुष्प रविवार दि. 20 रोजी सुप्रसिध्द इतिहासकार अरुण घोडके यांचे ’असे होते शंभूराजे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील भुषविणार आहेत. यावेळी लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश (बापू) जाडकर, लोणंद रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रविण चांदवडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक सागर शेळके, कार्याध्यक्ष नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, उपाध्यक्ष उदयसिंह जगताप, सचिव
अॅड. गजेंद्र मुसळे, खजिनदार सुनिल शहा, विश्वस्त मराठा पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अनिलराजे निंबाळकर, लोणंद बाजार समितीचे सभापती प्रा. सुनिल शेळके, राजेश गुजर, पत्रकार शशिकांत जाधव, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर ससाणे यांनी केले आहे.