लंडन कोर्टाकडून फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भारत प्रत्यर्पणासाठी मंजुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लंडन, दि.२५: PNB घोटाळ्यातील वाँटेड हीरा व्यापारी नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासंदर्भात यूके कोर्टात गुरुवारी अखेरची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने नीरवला भारताकडे सुपूर्द करण्याची मंजुरी दिली आहे. लंडनमध्ये व्हर्चुअल हिअरिंगनंतर जज सॅमुअल गूजीने म्हटले की, नीरव मोदीला भारतात सुरू असलेल्या खटल्यात उत्तर द्यावे लागेल. त्यांनी मान्य केले की, नीरव मोदीने पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.

न्यायाधीश पुढे म्हणाले की, नीरव मोदीला भारतात पाठवले जाणार म्हणजे, तिथे त्यांना न्याय मिळणार नाही, असे नाही. याशिवाय, कोर्टाने नीरव मोदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याच्या युक्तिवादाचेही खंडन केले. कोर्टाने मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील बॅरक नंबर-12 ला नीरव साठी फिट असल्याचे म्हटले.

आता गृहमंत्र्यांकडे जाणार प्रकरण

पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या 14 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये बंद आहे. त्याला भारताकडे प्रत्यर्पण करण्याचे प्रकरण सुरू होते. कोर्टाच्या निकालानंतर ही बाब अंतिम मंजुरीसाठी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे जाईल.

वकीलांनी नीरवला मानसिक आजारी म्हटले

सुनावणीदरम्यान नीरवच्या वकीलांना दावा केला की, नीरव मानसिक आजारी आहे. यासोबतच नीरवला भारतातील तुरुंगात योग्य व्यवस्था मिळणार नसल्याचेही म्हटले. भारतीय एजंसीकडून क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस (CPS) प्रकरणात युक्तीवाद मांडत आहे. CPS च्या बॅरिस्टर हेलन मॅल्कम म्हटल्या होत्या की, प्रकरण एकदम स्पष्ट आहे. नीरवने तीन पार्टनर असलेल्या आपल्या कंपनीमधून अब्जो रुपयांचा बँक घोटाळा केला.

14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसीने बँक अधिकाऱ्यांसोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा केला. हा घोटाळा गॅरंटी पत्राद्वारे केला. त्याच्यावर बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी CBI आणि ED ने खटला दाखल केला होता. याशिवाय इतरही काही प्रकरणे त्याच्याविरोधात दाखल आहेत.


Back to top button
Don`t copy text!