
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । लोणंद । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवार दिनांक २९ रोजी झालेल्या कांदा बाजारात हळवा/गरवा कांद्याचे दर प्रती क्विंटल ४०० ते १६११ रुपयां दरम्यान राहिल्याने बाजारात कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली.
मागील काही महिन्यांपासून लोणंदच्या बाजारात कांद्याला सातत्याने चांगला दर मिळत होता म्हणून शेतकरी वर्ग खुश होता .मागील आठवडय़ात सुद्धा कांदा आपला भाव टिकवून होता. गेल्या सोमवारची झालेल्या निलावा दरम्यान कांदा २७६० रूपयांवर होता. मात्र आठच दिवसात आज निलावा दरम्यान भाव गडगडल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी आज बाजारात कांदा पिशव्यांची आवक जास्त झाल्यामुळे भाव पडल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीच्या आवारात विक्री साठी आणावा असे आवाहन सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.