दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । लोणंद । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गुटख्याचा साठा केल्या प्रकरणी लोणंद पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे एक लाख ८६ हजार रूपये किमतीचा साठा जप्त करुन एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
लोणंद येथील गोटेमाळ परिसरात एका ठिकाणी अवैधरीत्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहीती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल के.वायकर यांनी याबाबतची माहीती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना देऊन अन्न व औषध प्रशासन विभाग साताराचे अधिकाऱ्यांशी संपर्क करुन त्यांना बोलावून घेत अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक, व तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली अन्न व ओषध प्रशासन विभाग साताराचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोणंद पोलीस स्टेशनची टीम दोन पंच असे पोलीस ठाणेतुन सदर ठिकाणी रवाना होवुन संयुक्तपणे धाड टाकुन कारवाई करुन बंदी असलेले विमल, आर.एम.डी. व हिरा कंपनीचे एक लाख ८६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन कारवाई करून सागर नाथाजी शिंदे रा लोणंद ता खंडाळा या आरोपीस ताब्यात घेतले.
सदर कारवाईत सपोनि विशाल के.वायकर, एस. एन. पवार महीला पोलीस उपनिरीक्षक, पो.हवा. अविनाश नलवडे, पो.काँ.विठ्ठल काळे, सागर धेंडे, विजय शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा येथील ओ. ओ. पवार,अन्न सुरक्षा अधिकारी, आर.आर.शहा, आय.एस. हवालदार यांनी सहभाग घेतला असुन पुढील तपास म.पो.उनि. पवार करीत
आहेत.