२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थैर्य, लोणंद, दि. २४ : लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंबाळवाडी येथे अवैध तीनपानी जुगाराच्या अड्ड्यावर लोणंद पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेरा जुगारींवर कारवाई करून रोख रक्कमेसह सुमारे चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की दि .२४ रोजी सायंकाळी सव्वा चार वाजताचे सुमारास डोंबाळवाडी ता.फलटण गावचे हददीतील डोंबाळवाडी गावात जाणारे रोडचे डावे बाजुस मनोज नरसिंह पवार रा.सोमवारपेठ फलटण यांचे शेतात विट भट्टी जवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तीन पानी जुगार चालत असल्याचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला असता एकूण तेरा जुगारींवर कारवाई करून रोख रक्कमेसह मोटारसायकल, मोबाईल फोन व चारचाकी असा एकूण चोवीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत मनोज मोहन कोकरे वय २९ वर्षे रा.पणदरे ता.बारामती , गणेश विठ्ठल कांबळे वय ३६ वर्षे रा.वडगाव निबाळकर ता.बारामती , उमेश रमेश खरात वय 40 वर्षे रा.लोणंद ता.खंडाळा , रामचंद्र बबन कर्नवर वय ५४ वष रा.गूळंचे ता.पेरंदर , बाळासो किसन मदने वय ३५ वर्षे रा.निरा वाघज ता.बारामती , जगन्नाथ सखाराम मदने वय ५० वर्षे रा.मिरेवाडी ता.फलटण , रुपेश राहुल कांबळे वय ३२ वर्षे रा.निंभारे ता.फलटण , महेश भालचंद्र भागवत वय ३४ वर्षे रा.बाळासाहेबनगर लोणंद ता.खंडाळा ,सुनिल धुमसेन सोनवणे वय ५८ वर्षे रा.पिंपरे खु. ता.पुरंदर , दत्तात्रय पोपट गायकवाड वय २८ वर्षे रा.पणदरे ता.बारामती , सुरेश आनंता भुजबळ वय ६६ वर्षे रा.वाल्हे ता.पुरंदर , सागर सुरेश खंडाळे वय ३३ वर्षे रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती , मनोज नरसिंग पवार वय ३३ वर्षे रा.सोमवार पेठ ता.फलटण . अशा तेरा जनांवर भादविसह १८८,२६ ९ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४, ५ अन्वये स्वताचे आर्थिक फायदयाकरीता बेकायदा , विगरपरवाना तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना मा.जिल्हाधिकारी सो सातारा यांनी पारित केलेला कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन तोंडास मास्क न लावता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता हयगयीने एकत्र बसुन मानवी जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याच संभव असल्याने घातक कृती करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केलेले मिळुन आल्याने गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी पोकाॅ. अविनाश शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या कारवाईत सपोनि संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ देवेंद्र पाडवी, पो.ना. ज्ञानेश्वर मुळीक, पो.ना. मल्हारी भिसे, पो. को. फैयाज शेख, पो.को. श्रीनाथ कदम, पोकाॅ अविनाश शिंदे, पोकाॅ केतन लालगे, होमगार्ड संतोष इंगवले, ओमकार कोळी, भिकू येळे, जयदीप भोईटे यांनी भाग घेतला.