
स्थैर्य, लोणंद, दि. 26 : महाराष्ट्र पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडले जात असताना लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी पोलिस हवालदार अविनाश नलवडे यांचा वाढदिवस पीपीई किट, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, फेस शील्ड,छ-95 मास्क,कॅप, एनर्जी ड्रिंक, पाणी बॉटल असे साहित्य भेट देऊन एक अनोख्या पद्धतीने साजरा केले.
लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि. संतोष चौधरी कोरोनाचा सामना करताना गेल्या काही दिवसापासुन विविध सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहेत. नुकताच कोरोनामुक्त मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आज सपोनि. संतोष चौधरी यांनी पोलीस हवालदार अविनाश नलवडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
सद्यस्थितीत कोरोनावर मात करीत असताना नागरिकांच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर आदींना खूप महत्व प्राप्त झालेले आहे. शिवाय कोरोनाच्या सानिध्यात जाऊन प्रत्यक्ष कार्य करणार्या प्रत्येक व्यक्तींना पीपीई किटची गरज भासू लागली आहे.
लोणंद पोलीस स्टेशनकडून पोलिसांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस कर्मचार्यांची विशेष काळजी घेत पोलीस हवालदाराच्या वाढदिवसानिमित्त त्याला एक आगळे वेगळे गिफ्ट देण्याचा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
सपोनि. संतोष चौधरी यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या वेळी लोणंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.