
स्थैर्य, सातारा, दि. 23 सप्टेंबर : लोणंद बाजार समितीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न संचालक मंडळ गेल्या दोन वर्षांत सातत्याने करत आहे. त्याचाच परिपाक म्हणून राज्यातील 70 बाजार समितीतून लोणंद बाजार समितीने मूल्यांकन परिक्षणात तिसरा क्रमांक मिळाला आहे. कांदा व भुसार मालाची 48 कोटींची, शेळी-मेंढी बाजारात 60 कोटींची अशी एकूण 108 कोटी 57 लाखांची उलाढाल होऊन उत्पन्नातही भरीव वाढ झाल्याचे लोणंद बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील यांनी सांगितले.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या 17 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून सभापती शेळके- पाटील बोलत होते. यावेळी उपसभापती भानुदास यादव,संचालक सिद्धेश्वर राऊत, भगवानराव धायगुडे, शिवाजीराव शेडगे, नारायणराव धायगुडे पाटील, यशवंतराव चव्हाण, वैशाली घाडगे, उज्ज्वला मांढरे, संग्राम देशमुख, साहेबराव धायगुडे, राजेंद्र नेवसे, विजयराव धायगुडे, शिवाजीराव मोरे, संजय कदम, अरुण गालिंदे, जयेश शहा, विश्वास शिरतोडे, सचिव अमोदशेळके, माजी उपसभापती दत्तात्रय बिचुकले, नगरसेवक सागर शेळके उपस्थित होते.
सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील म्हणाले, 2023 च्या निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील यांच्यावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ज्या विश्वासाने सत्ता दिली. तो विश्वास सार्थ ठरवताना बाजार समितीने उत्पन्नात एक कोटी 68 लाखांपर्यंत भरीव वाढ करून संचालक मंडळ शेतकर्यांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. लोणंद बाजार आवारात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फ्युरिफायर मशिन, शिरवळ, खंडाळा, लोणंद, येथे प्लड लाइट्स, लोणंद बाजार आवारातील बकरी बाजाराच्या आवाराचे मुरमीकरण केले. मात्र, तरीही चिखल होत असल्याने बकरी बाजार आवाराचे संपूर्ण अस्तरीकरण करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. माजी उपसभापती दत्तात्रय बिचुकले, नगरसेवक सागर शेळके व व्यापारी बिपिन शहा यांनीमनोगत व्यक्त केले.
यावेळी लोणंद बाजारात सर्वाधिक कांदा आणून विकणारे शेतकरी दगडू हाडंबर, श्री. कोळेकर, मोहन माने, चंद्रकांत जाधव, ठकसेन धायगुडे, किरण कारंडे, धनाजी भोसले यांचा तसेच व्यापारी गोकुळदास शहा, शांतिलाल रायचंद दोशी, मनसुखलाल शहा, महेश भोईटे, दत्तात्रय गिरी, बिपिन शहा, दिलीप परदेशी, शांतिलाल दोशी, दीपक झणझणे, हमाल मापाडी राजेंद्र कदम, संतोष पवार, सुधीर मदने तसेच बाजार समितीचे अधिकारी दत्तात्रय कचरे व सचिव अमोद शेळके यांचा सत्कार करण्यात आला.संचालक राजेंद्र नेवसे यांनी स्वागत केले. सचिव अमोद शेळके यांनी सभेपुढील विषयाचे वाचन केले. संचालक भगवानराव धायगुडे यांनी आभार मानले.

