दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । लोणंद । लखीमपुरमध्ये गाडया अंगावर घालुन शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या सरकाराचा जाहिर निषेध महा विकास आघाडीच्या वतीने करण्यात येत असून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक असता या घटनेला लोणंद शहरातील शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने लोणंद शहरातून मोर्चा काढून व काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी दयानंद खरात डॉ नितिन सावंत विनोद क्षीरसागर, सागर शेळके, लक्ष्मण तात्या शेळके, हणमंत शेळके, रविंद्र क्षीरसागर,गणी भाई कच्छी,जावेद पटेल, कय्युम मुल्ला,बबलु भाई इनामदार, शफी मुलाणी, दशरथ जाधव, भरत बोडरे, एन डी क्षीरसागर, अरुण गालिंदे, रोहन धायगुडे, हेमंत पवार,बंटी खरात, तौफिक कुरेशी, असगर इनामदार, अल्ताफ सय्यद, कृष्णा माने,सर्फराज बागवान, शैलजा खरात, शामसुंदर डोईफोडे, म्हस्कुआण्णा शेळके पाटील, अॅड बबलु मणेर, शरद भंडलकर,रमेश कर्णवर,बाळासाहेब शेळके पाटील, एन सी खरात, सुनिल यादव, लक्ष्मण जाधव, अविनाश नलावडे, राजेश शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ११ वाजेपर्यत संपुर्ण लोणंद बंद ठेवण्यात आले होते त्यानंतर व्यापारी यांनी आपआपली दुकाने उघडली होती राष्ट्रवादीकडून लोणंदचे सपोनि विशाल वायकर यांना निवेदन देण्यात आले असून यात म्हटले आहे की केंद्र सरकारच्या विरोधात मागील एक वर्षापासून शेतकरी लोकशाही मार्गाने अंदोलन करत आहेत केंद्र सरकारकडून या अंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे उत्तर प्रदेश येथील लखीमपुर येथे गाडया अंगावर घालुन अंदोलक शेतकऱ्यांची निर्घण हत्या करण्यात आली याबाबत भाजप सरकारचा जाहिर निषेध महा विकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंद करण्यात येत आहे मृत झालेल्या अंदोलक शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा व निर्घण हत्या करणाऱ्यास कडक शिक्षा व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी लोणंद शहर यांच्याकडून या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.