लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलातील यशस्वी निकालाची परंपरा कायम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


यशस्वी विद्यार्थ्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले अभिनंदन

स्थैर्य, दौलतनगर दि. 30 : दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल धावडे व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या चार विद्यालयांचा इयत्ता दहावीचा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील निकाल नुकताच जाहिर झाला आहे. शैक्षणिक संकुलातील विद्यालयांनी आपली निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली असून वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल,दौलतनगरचा 100 टक्के,शिवाजीराव देसाई विद्यालय,सोनवडे विद्यालयाचा 96.87 टक्के,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे विद्यालयाचा 96.07  व न्यू इंग्लिश स्कूल,नाटोशी विद्यालयांचा 91.66 टक्के निकाला लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संकुलाचे प्रमुख राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर,शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विद्यालयांमध्ये सुसज्ज इमारतींसह उच्चशिक्षित शिक्षक वर्ग असून या विद्यालयांमध्ये  विभागातील विद्यार्थी-विद्यार्थीनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत. तसेच या विद्यालयांमध्ये  शिक्षणांचा दर्जा चांगला राखला असल्याने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल लागला असून निकालात इंग्लिश मिडीयम स्कूलने बाजी मारली आहे.शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे विद्यालयाचा 96.87 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल धावडे विद्यालयाचा 96.07 व न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी विद्यालयाचा 91.66 टक्के निकाला लागला आहे. वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील कु. श्वेता भाकरे हिला 88.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, शिवाजीराव देसाई विद्यालयात प्रथम क्रमांकाने कु.अश्विनी संजय वर्पे हि उत्तीर्ण झाली असून तिला 92.40 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल धावडे विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक राहुल जाधव याला 93 टक्के तर न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक कु.लक्ष्मी डांगळ हिला 81.80 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे विशेष लक्ष तसेच उच्चशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन असल्यामुळेच आम्ही हे यश संपादन करु शकलो असल्याच्या प्रतिक्रिया प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलातील वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यू इंग्लिश स्कूल,धावडे व न्यू इंग्लिश स्कूल,नाटोशी या विद्यालयां मधील यशस्वी तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, विविध संस्थांचे  पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!