स्थैर्य, फलटण, दि. १४ : राज्यसह आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे परिस्थिती हि हलाखीची बनलेली आहे. फलटण तालुक्यामधील हमाल, मजूर, झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिक यांना रोजगार नाही. शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीचा सदर नागरिक हे लाभ घेत असून शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उपक्रमास लोकमान्य उद्योग समूहाच्या अंतर्गत असलेल्या सूर्या एच. पी. गॅस एजन्सीच्या माध्यमातून तांदूळ, तेल, डाळी व मसाले अश्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
या वेळी लोमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी के यादव, मॅनेजर अमोल जगताप, काकडे, कुंभार, चांडक व कर्मचारी उपस्थित होते.