नागपुरात 15 ते 21 मार्च पर्यंत लॉकडाउन, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून पालकमंत्री नितीन राउत यांची घोषणा


स्थैर्य, नागपूर, दि.११: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्यभरातील अनेक शहरांमध्ये निर्बंध लावले जात आहे. आता नागपुर शहरातही 15 ते 21 मार्चपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. पालक नितीन राऊत यांनी याविषयी घोषणा केली आहे.

नितीन राऊत यांनी सांगितले की, क्वारंटाइन सेंटर पुन्हा सुरू केले जातील. यासोबतच नागपूर शहरामध्ये लक्ष्मीनगर, धरमपेठ हॉटस्पॉट असल्याने बंद राहतील. शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मास्क न घालणाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई करण्यात येईल. 10 मार्चला 1700 पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचर रुग्ण वाढीस लागले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय सुरू

  • अत्यावश्यक सेवेत बँक, पोस्ट, भाजीपाला, दुग्ध अंडी मास सुरू
  • चष्म्यांची दुकाने सुद्धा सुरू राहतील
  • लॉकडाउनमध्ये उद्योग सुरू राहतील
  • सरकारी कार्यालयांमध्ये 25 टक्के कर्मचारी
  • आर्थिक लेखा संबंधित काम असल्यास पूर्ण क्षमतेने परवानगी
  • वैद्यकीय सेवा, माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र दाखवावे लागेल
  • माध्यम प्रतिनीधींना अपील, आरटीपीसीआर करा, निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवा
  • दारु विक्री दुकाने बंद, ऑनलाइन विक्री सुरू
  • खाद्य पदार्थांच्या सेवा सुरू
  • लसिकरण सुरू

काय बंद

  • खासगी कार्यालये पूर्णपणे बंद
  • शाळा, महाविद्यालये बंद
  • कडक संचारबंदी राहील
  • दारुची दुकाने बंद

Back to top button
Don`t copy text!