धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 30 : लॉकडाऊन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. लॉकडाऊन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
8 जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स 8 जूनपासून उघडणार आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असणार आहे. तसेच मास्क घालणेही अनिवार्य असणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 30 जूनपर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहिल.
– 30 जून 2020 पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे.
– कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाऊन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.
दुसर्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.
तिसर्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल.
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
या शहरांमध्ये कायम राहू शकतो लॉकडाऊन –
मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरम यांचा समावेश आहे.
राज्याकडेही आधिकार
राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.