स्थैर्य, फलटण, दि. १९ : फलटण शहरासह तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.
सध्या फलटण मध्ये सोशल मीडिया वर सकाळी सात ते दुपारी अकरा वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील असे मेसेज फिरत आहेत. तरी ते आपल्या म्हणजेच सातारा जिल्ह्यातील नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सोबतच सातारा जिल्ह्याच्या सीमा आज रात्री पासून बंद वैगरेचे मेसेज फिरत आहेत. अशा अफवांवर सुद्धा नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे.
सध्या फलटणमध्ये कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढत आहेत. तरी नागरिकांनी काळजी घेणे हे आवश्यक आहे. जर गरज नसेल नागरिकांनी घराबाहेर पडू नका, जर महत्वाच्या कामासाठी बाहेर पडला तर मास्क व सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे ह्या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करा. फलटण तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी फलटण तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी, असेही आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.