देसाई इस्टेट मधील रस्ता रुंदीकरणाच्या रस्ता रुंदीकरणास स्थानिकांचे सहकार्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरण होत असताना देसाई इस्टेट मधील रस्ता रुंदीकरण हा कळीचा मुद्दा होता. परंतु स्थानिक नागरिक व पदाधिकारी यांनी सामंजस्याने हा विषय हाताळल्याने रस्ता रुंदी करणं विना अडथळा पार पडले नवीन रस्ता झाला व नवीन व्यवसायाचा शुभारंभ झाला.

देसाई इस्टेट मधील नीरा डावा कालव्याच्या सुशोभीकरण करताना कालव्याच्या शेजारील रस्ता व त्या रस्त्यावर अनेक कुटूंबानी अतिक्रमण केले होते. त्यामुळे रस्ता नियमापेक्षा लहान झाला होता व वाहतुकीस अडथळा निर्माण करत होता. पाटबंधारे विभाग व नगरपरिषद यांनी सांगून सुद्धा अतिक्रमण काढले जात नव्हते. वर्षानुवर्षे आमच्या पूर्वजांच्या मालकीच्या जागेत आम्ही राहत आहे, असे स्थानिक रहिवासी यांचे म्हणणे होते.

स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीरा डावा कालव्याची पाहणी करताना स्थानिक नागरिकांशी चर्चा करून अतिक्रमण काढण्यास विनंती करून विकासकामास सहकार्य करण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानास प्रतिसाद देत नागरिकांनी नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे यांच्याशी चर्चा करून सदर अतिक्रमण काढले. त्यानंतर भव्य डांबरी 30 फुटी रुंद रस्ता करण्यात आला त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ लागली.

त्यानंतर नागरिकांनी नवीन रस्त्याच्या पलीकडे नवीन दुकान, घराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्याचा शुभारंभ नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष संग्राम खंडागळे, देसाई इस्टेट युवक शाखा अध्यक्ष युवराज गजाकस, राहुल वायसे, विनीत ठोंबरे, बिनू आटोळे, शिवलिंग गजाकस, प्रकाश गजाकस आदी मान्यवर उपस्तीत होते.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत अतिक्रमण काढल्याबद्दल नगरसेवक अतुल बालगुडे यांनी आभार व्यक्त केले. नवीन बारामतीच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भूमिका असेल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आभार प्रकाश गजकस यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!