ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात १६ ऑक्टोंबर रोजी स्थानिक सुट्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मुक्त, स्वच्छ व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मोरगिरी, घाणव ता. पाटण, मोळेश्वर ता. महाबळेश्वर, भणंग ता. जावली या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता निवडणूक क्षेत्रात नमूद ठिकाणी  रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी खालील अटीस आधिन राहून स्थानिक सुट्टी जाहीर करीत आहे. 

संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स रिटेलर्स इ. या आस्थापनामधील कामगारांना  रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सट्टी जाहीर करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी   नमुद केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील/निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम/अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात येत आहे. 


Back to top button
Don`t copy text!