स्थानिक विकास निधीतून विलासपूरला पायाभूत सुविधा देणार – बापूजी साळुंखे नगर येथील बगीचा भूमीपूजन प्रसंगी उदयनराजे यांचे आश्वासनं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | विलासपूर हा भाग नव्याने सातारा शहराच्या हद्दीत आला आहे . या भागातील नागरिकांना पायाभूत सोयी स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात येतील अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली .

उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व युवा उद्योजक संग्राम बर्गे यांच्या पुढाकाराने बापूजी साळुंखे नगर येथे होत असलेल्या बगीचा आणि ओपन जीमच्या भूमीपूजन प्रसंगी उदयनराजे बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आशाताई जाधव, बाळासाहेब पिसाळ, किरण नानवडे, सतीश माने, राहुल पाटोळे, विकास पवार, महेश चौगुले आबा शिंदे, काका बागल, उदय मराठे, अरूण राजेभोसले उपस्थित होते .

उदयनराजे पुढे म्हणाले, विलास पूर भागातील नागरिकांचा विरंगुळा आणि आरोग्य या कारणांसाठी बगीचा व ओपन जीम उभारण्यात येत आहे . ही विकासकामे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे . या भागाच्या विकासाकरता आम्ही कायमच सिध्द आहोत . विलासपूर हा भाग नगर पालिकेच्या हद्दीत आल्याने या भागाला सेवा सुविधा उपलब्ध निश्चितपणाने करून दिल्या जातील .विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे . येथे विकासकामे झाली म्हणून आम्ही निवांत बसणार नाही . या भागासाठी नगरोत्थान योजनेतून जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न विलासपूरच्या मुख्य रस्त्यावर पथदिवे उजळले आहेत . याशिवाय वाढीव पाणी पुरवठा योजना, प्रशस्त उद्यानं , जॉगिंग ट्रॅक, चारही बाजूने संरक्षक भिंत इं सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे आश्वासनं उदयनराजे यांनी दिले .


Back to top button
Don`t copy text!